पुणे | प्रतिनिधी
पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे आसरा सोशल व ओम् पब्लिकेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष भारत सन्मान सोहळा – पुणे २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात लेखिका रामेश्वरी राहुल गाडगे लिखित “पदरापासून ते पासवर्डपर्यंत” या पुस्तकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मा. विजय गोखले यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), मा. धनराज हरडे, सौ. जयश्री विनोद भड तसेच प्रा. डॉ. बी. एन. खरात यांची उपस्थिती लाभली.
पुस्तक प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवरांनी “पदरापासून ते पासवर्डपर्यंत” या पुस्तकाच्या विषयाचे कौतुक करत, बदलत्या काळातील स्त्रीच्या प्रवासाचे प्रभावी चित्रण असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कर्तृत्वाचा सन्मान आणि समाजाला प्रेरणा देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.
*उत्कर्ष भारत सन्मान सोहळ्यात रामेश्वरी राहुल गाडगे लिखित पदरापासून ते पासवर्डपर्यंत’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन*