नवी दिल्ली | (सद्वार्ता)
अखिल भारतीय मारवाडी गुजराती सोशल कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष, IHCAC चे राज्याध्यक्ष, एमएसबाना प्रा. लि.चे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय अॅक्युप्रेशर सल्लागार डॉ. अजित बागमार यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल गुरु अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
हा सन्मान युनायटेड गुरुकुल फाउंडेशन आणि इंटरनॅशनल होनोरिस अवॉर्ड कौन्सिल (यूएसए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. जे. शांडिल्य यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
डॉ. अजित बागमार यांनी अॅक्युप्रेशर, सामाजिक सेवा, आरोग्य जनजागृती आणि विविध लोककल्याणकारी उपक्रमांद्वारे देशभरात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान देण्यात आला.
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून विविध सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.