नाशिकच्या विकासात उल्लेखनीय योगदानाची दखल; २७ जून रोजी होणार गौरव
नाशिक। एसडी न्यूज़ एजेंसी । सामाजिक, आरोग्य, नैसर्गिक उपचार आणि संस्थात्मक कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अजित हुकुमचंद बागमार यांची प्रतिष्ठित ‘लोकमत ब्रँड्स ऑफ नाशिक २०२६’ सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत लोकमत मीडिया समूहाने त्यांना अधिकृत निमंत्रण व पुरस्कार पुष्टीपत्र (Aैar् ण्दहfग्rस्aूग्दह थूूी) प्रदान केले आहे.
लोकमत मीडिया समूहाच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रानुसार, नाशिकच्या विकास, विश्वासार्हता आणि आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या संस्था व व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. बागमार यांच्या संस्थेने सातत्यपूर्ण, विश्वासार्ह आणि उत्कृष्ट कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठित सन्मानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हा गौरव सोहळा २७ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, रॉयल हॉल, हॉटेल एक्सप्रेस इन, नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून, उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. अजित बागमार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
डॉ. बागमार यांच्या या निवडीमुळे त्यांच्या सामाजिक कार्याला आणि नाशिकच्या विकासातील योगदानाला आणखी एक प्रतिष्ठेची नोंद मिळाली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकमतच्या ‘ब्रँड्स ऑफ नाशिक’ सन्मानासाठी डॉ. अजित बागमार यांची निवड