नाशिक (प्रतिनिधी):
मे २०२६ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल १८ जून २०२६ रोजी रात्री जाहीर झाला. देशभरात यंदा ७,९३१ विद्यार्थी सीए झाले आहेत. मागील परीक्षेत ही संख्या ७,५९० होती. त्यामुळे यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४०० ने वाढली आहे.
प्रथम गटासाठी ५४,६०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६,५५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी १२ टक्के आहे. मागील तीन परीक्षांमध्ये ही टक्केवारी अनुक्रमे २१.०३, २२.३८ आणि २४.६६ होती. द्वितीय गटासाठी ४२,५७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
त्यापैकी ८,७२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी २०.४९ आहे. मागील तीन परीक्षांमध्ये ही टक्केवारी अनुक्रमे ९.७६, २५.२६ आणि २६.४३ होती. दोन्ही गट एकाचवेळी देणाऱ्या २३,७७६ विद्यार्थ्यांपैकी ३,३४५ विद्यार्थी यशस्वी झाले. या गटाचा निकाल १४.०७ टक्के लागला असून मागील तीन परीक्षांमध्ये तो अनुक्रमे
१०.९७, १६.२३० होता. देशातील ५४४ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. १६.२३ आणि १८.७२ टक्के
देशात प्रथम क्रमांक मिळविला. पटियाला येथील नूर सिंगला यांनी ८३.१७ टक्के गुण मिळवत मागील
परीक्षेतील प्रथम क्रमांक धारकाला ८१ टक्के गुण मिळाले होते. हावडा येथील रितेज सराफ यांनी ७९.१७ टक्के (४७५ गुण) मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर डोंबिवली येथील सोहन मांजरेकर यांनी ४७३ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
नाशिक परीक्षा केंद्राचा निकाल खालील प्रमाणे
दोन्ही गटांतून बसलेले विद्यार्थी: २४५, दोन्ही गटांतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थीः ४२ (१७.१४ टक्के), फक्त गट १ मधून उत्तीर्ण विद्यार्थीः ११ (४.७२ टक्के), फक्त गट २ मधून उत्तीर्ण विद्यार्थी १६, एकूण बसलेले विद्यार्थी : ६२९, एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : ११४ (१८.१२ टक्के)
यापूर्वी सीए फायनल परीक्षा वर्षातून तीन वेळा घेतली जात होती; मात्र आता ती वर्षातून दोनच वेळा होणार आहे. यंदाच्या निकालात मागील परीक्षेच्या तुलनेत केवळ प्रथम गटाचा निकाल कमी असला तरी इतर गटांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. सध्या सीए व्यावसायिकांची मागणी वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशनपासूनच भक्कम पाया तयार करून योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करणे आवश्यक आहे सीए फाउंडेशनच्या निकालाची तारीख अद्याप घोषित झालेली नाही.
प्रा. लोकेश पारख, सीए व वाणिज्य परीक्षा मार्गदर्शक