पाटोदा (गणेश शेवाळे) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच अमळनेर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सामाजिक कार्यातून व ग्रामविकासाच्या धडपडीत नेहमी आघाडीवर असलेले भाऊसाहेब आण्णा भवर.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ग्रामीण भागातील प्रश्न सोडविणे, शेतकऱ्यांच्या अडचणींवर आवाज उठविणे, तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रमात सहभागी करून घेणे यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. परिणामी, निवडणुकीचे बिगुल वाजताच कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत “गटात भाऊसाहेब आण्णाच नाव जोरदार चर्चेत आहे” अशा चर्चा रंगताना दिसत आहेत. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशा सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांची चांगली ताकद असलेल्या भाऊसाहेब भवर यांना स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार आहे. त्यामुळे गटात इतर इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू असली तरी जनतेच्या मनातील पसंतीची मुहर मात्र भाऊसाहेब भवर यांच्याच नावावर दिसते आहे.काही दिवसांत पक्षीय समीकरणे आणि अधिकृत उमेदवारीचे गणित स्पष्ट होणार असले तरी, सध्या तरी अमळनेर गटात भाऊसाहेब आण्णा भवर यांच्या नावाचीच जोरदार चर्चा रंगत आहे.
Related Posts
डॉक्टर अमोल मोहळकर यांनी योग्य उपचार केल्याने गाईला मिळाले जीवदान
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. अमोल मोहळकर यांचा कर्तव्य दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आला आहे. पाटोदा शहरातील…
*सोलापूर जिल्हातील अनगर नगरपंचायतची पुनरावृत्ती आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात पहिला मिळणार*
➡️भाजपचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांच्या लोकप्रियतेमुळे काही जिल्हापरिषद गट व पंचायत समिती सदस्य बिनविरोध होणार? पाटोदा *(गणेश शेवाळे)*…
मोफत पोलीस भरती आणि शिष्यवृत्ती मिळवा.SC ST.OBC विद्यार्थ्यांना संविधान रक्षक श्री संतोष भाऊ सुरवडकर, दत्ताभाऊ झनकर यांनी केले आवाहन
पिंपळगाव ब. (कृष्णा गायकवाड) 20 ऑगस्ट शेवटची तारीख* . संविधानवादी युवक व युवतींनी जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये सहभागी व्हावे…